महाराष्ट्राची सत्ता सामान्य लोकांची असेल – शरद पवार

बारामती  : महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार घालवण्याचे काम ज्यांनी केलं त्यांना मतदान करणार नाही. राजकारणामध्ये कधी यश असते कधी अपयश असते कधी सत्ता असते कधी नसते परंतु सत्ता नसते त्यावेळेस सात सोडायची नसते, हा विषय भावनेचा नाही तर विचारांचा आहे महाराष्ट्राची सत्ता सामान्य नागरिकांची असली पाहिजे असे शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार युगेंद्र श्रीनिवास पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त श्री क्षेत्र कण्हेरी ता. बारामती येथे सभा पार पडली .

शरद पवार पुढे म्हणाले, आमचे काही सहकारी पहाटेच उठले आणि त्यांनी पहाटेची शपथ घेतली. घर आम्ही फोडत असल्याचा आरोप केला जात आहे परंतु घर एकत्रच ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. राज्यात अनेकांना मंत्री केले उपमुख्यमंत्री केले परंतु सुप्रिया सुळे यांना एकदाही कोणतेही पद दिले नाही. माझे भाऊ अनंतरावांसह माझ्यावर प्रेम करणारे होते. घर फोडण्याचा काम मी कधीच केलं नाही आणि माझ्याकडून ते होणार नाही. नवीन नेतृत्व निर्माण करायचे असते उद्याचा विचार करून आणि त्या अनुषंगाने योगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

याप्रसंगी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री व इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार व वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे, विजयराव मोरे, श्रीनिवास दादा, शर्मिला वहिनी , विजयराव कोलते, पृथ्वीराज जाचक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश मामा खोमणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, बारामती तालुकाध्यक्ष एस एन बापू जगताप, सदाशिव (बापू) सातव, सुभाष ढोले, शहराध्यक्ष संदीप गुजर, राजेंद्र बापू जगताप, महिला तालुकाध्यक्ष वनिता बनकर, तेजसिंह पाटील, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारूद्र पाटील, महिला शहराध्यक्षा आरती शेंडगे-गव्हाळे, माजी नगरसेवक सुरज सातव, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत बोरकर, युवक शहराध्यक्ष सत्यव्रत काळे, तुकाराम चौधरी, युवक ग्रामीण कार्याध्यक्ष गौरव जाधव, युवती तालुकाध्यक्ष प्रियांका शेंडकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, संघर्षाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या हातातून ओढून घेण्याचे काम अदृश्य शक्तीने केले आहे, पण तुमची ही लेक अदृश्य शक्तीसमोर लढताना मोडेन पण वाकणार नाही असा विश्वास व्यक्त केला.  या सरकारला छत्रपती, फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, तसेच भाजपाने जयश्री थोरात व राज्यातील सर्व महिलांची माफी मागितली पाहिजे,आपली आजची लढाई ही भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे. आपला देश हा संविधानाने चालला पाहिजे, तो अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही.

आपले अधिकृत उमेदवार युगेंद्र श्रीनिवास पवार यांना बारामतीकर आशिर्वाद देतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. युगेंद्र पवार यांच्याकडून अनंत आशा आहेत, ते बारामतीचा शाश्वत विकास करतील यासाठी बारामतीकरांनी त्यांना आशीर्वाद आणि पाठबळ द्यावे, अशी  विनंती केली.

See also  कोथरुडमधील प्रभाग १३ मध्ये घुमला जय श्रीरामचा नारा चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद