पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सोमेश्वरवाडी ग्रामस्थांचा सचिन दळवी यांना बैठक घेत एकमुखी पाठिंबा

सोमेश्वरवाडी : सुस बाणेर पाषाण प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपा इच्छुक उमेदवार सचिन दळवी यांना सोमेश्वरवाडी ग्रामस्थांनी एकमताने पाठिंबा दर्शवला आहे.

सोमेश्वरवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत सचिन दळवी यांना आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देऊन सोमेश्वरवाडी गावाचे प्रतिनिधित्व करण्याची एकमुखी मागणी मान्य केली.

भाजपाकडून सचिन दळवी व त्यांच्या पत्नी लक्ष्मी सचिन दळवी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. गावातून सचिन दळवी यांना एकमुखी पाठिंबा मिळाला असल्याने सात गावांमधून आपल्या गावाचा एकमताने पाठिंबा मिळवणारे ते पहिले उमेदवार ठरले आहेत. सोमेश्वर वाडी ग्रामस्थांनी पहिल्यांदाच नगरसेवक पदासाठी एकमताने पाठिंबा देत गावचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तसेच प्रभागातील गाव भेट दौऱ्या दरम्यान सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे प्रचारात सहभागी होणार आहेत. यामुळे भाजपा कोणाला उमेदवारी देणार याबाबत अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे.

See also  सर्व समाजघटकांना न्याय देऊन राज्यातील विद्यार्थिनींच्या पंखांना बळ देणारा अर्थसंकल्प - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील