खडकवासला मतदारसंघात नामांकन प्रक्रियेचा शेवटचा दिवस: 28 उमेदवारांनी 39 अर्ज दाखल, फक्त एका महिला उमेदवाराचा अर्ज दाखल

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात आज नामांकन प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किरण सुरवसे आणि नोडल अधिकारी अभिषेक धुमाळ यांच्या नेतृत्वात नामांकन कक्षात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. सहाय्यक महसूल अधिकारी चंद्रशेखर मते, वैभव मोटे आणि रविकांत बडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभराच्या आजपर्यंत आत एकूण 28 उमेदवारांनी 39 अर्ज दाखल केले आहेत.


या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी नामांकन कक्षात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. अनेक उमेदवारांनी अखेरच्या क्षणी आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी अर्ज दाखल केले. निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांनी प्रत्येक अर्जाची तपासणी करून, नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पाडल्या आहेत. नामांकन कक्षात शिस्तबद्ध वातावरणात सर्व अर्ज स्वीकारण्यात आले आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.


खडकवासला मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत तगडा लढा अपेक्षित आहे, असे निरीक्षकांचे मत आहे. नामांकन प्रक्रियेचा हा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची यादी तयार होईल, आणि आता प्रचाराचा रंग अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

See also  वृक्षारोपण संकल्पाची यशस्वी सुरुवात पहिल्या टप्प्यात कोथरुड मध्ये ६५०० वृक्षांची लागवड