अखंड मराठा समाजाचे कार्यकर्ते विजय किसन बराटे यांचा कोथरूड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

कोथरूड : अखंड मराठा समाजाचे कार्यकर्ते विजय किसन बराटे यांनी कोथरूड मतदार संघामधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

विजय बराटे मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत गेले अनेक महिने पुण्यामध्ये प्रचार व प्रसार करीत आहेत. पुणे येथे झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पुण्यातील सभेच्या वेळी आयोजनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. या भूमिकेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कोथरूड मतदार संघातील मराठा बांधवांच्या आग्रहास्त विजय बराटे यांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले होते त्यानुसार त्यांनी मराठा समाजाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

कोथरूड मतदार संघामध्ये मराठा समाजाची सर्वाधिक मतदार संख्या आहे. सुमारे दीड लाख मतदार कोथरूड मतदार संघात मराठा समाजाचे आहेत. कोथरूड मतदार संघामध्ये मागील निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा उमेदवार नसल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्यात आला होता. परंतु यावेळी मराठा समाजाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी यंदा कोथरूड मध्ये मराठा उमेदवार निवडून देण्यात येईल असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  बियाणे, खते खरेदी करताना अशी घ्यावयाची काळजी