दिल्लीच्या आदेशाने महाराष्ट्रात धार्मिक व जातीय फूट पाडणाऱ्यांना धडा शिकवण्याची ही निवडणूक – हडपसर येथील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या मेळाव्यात निर्धार

हडपसर : हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचा भव्य मेळावा  ससाणे नगर येथे संपन्न झाला.

यावेळी माजी राज्यमंत्री श्री. बाळासाहेब शिवरकर, माजी खासदार सौ. वंदनाताई चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. अरविंद शिंदे, ज्येष्ठ नेते श्री. अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे माजी शहराध्यक्ष श्री. रविंद्र माळवदकर, माजी उपमहापौर श्री. बंडु गायकवाड, माजी उपमहापौर श्री. निलेश मगर, मा. नगरसेवक श्री. योगेशबापू ससाणे, श्री. विजयराव देशमुख, मा. नगरसेविका सौ. पूजाताई कोद्रे, मा. नगरसेवक श्री. विशालजी तांबे, सौ. मंजिरी घाटगे, काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष श्री. दिलीप तुपे, पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. संजय शिंदे, शफीभाई इनामदार, श्री. संदीप कोद्रे, श्री. अविनाश काळे, श्री. हेमंत बधे, असिफभाई पटेल, अल्ताफ भाई, श्री. दत्तात्रय खवले, श्री. शक्ती प्रधान, श्री. संजय गायकवाड, डॉ. लालासाहेब गायकवाड़,श्री. प्रशांत सुरसे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


यंदाची विधानसभा निवडणूक ही कोणत्याही एका पक्षाची किंवा एका उमेदवाराची नसून, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कष्टाने उभ्या केलेल्या संघटना फोडणाऱ्यांना धडा शिकवण्याची, दिल्लीच्या आदेशाने महाराष्ट्रात धार्मिक व जातीय फूट पाडणाऱ्यांना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे.
महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम असल्याने आपण सगळे मिळून या स्वाभिमानाचा संघर्ष नक्की विजयी होऊ हा निर्धार यावेळी सर्वांनी मेळाव्यात व्यक्त केला.

See also  'आरटीओ'त एजंट व एजन्सीला परवानगी नाही तरी पुणे महानगरपालिकाचे वाहन पासिंगसाठी एजन्सी नेमणूकीचे दीड कोटीचे टेंडर