चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने झाले बाणेर-बालेवाडीला स्वतंत्र वीज उपकेंद्र

पुणे हे एकेकाळचे छोटेसे शहर विस्तारत असताना, नागरीकरणाच्या वाढत्या रेट्यामुळे पेठांच्या सीमा ओलांडून अनेक नवीन क्षेत्रे विकसित झाली. यात बाणेर-बालेवाडी भागाचा विशेष उल्लेख आवश्यक ठरतो. नव्याने विकसित होत असलेल्या या भागात एक मोठा, गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. रोजच्या जगण्याशी जोडलेला हा प्रश्न होता, वीजपुरवठ्याचा… ज्यामुळे कोथरूडवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. वारंवार वीज गायब होत असल्याने येथील रहिवासी त्रस्त झाले होते.


या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राची मागणी सातत्याने होत होती. कोथरूडचे लोकप्रिय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी या समस्येची दखल घेतली आणि प्रभावी पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बालेवाडी येथील सर्व्हे क्र. ४/१ येथे ६५ गुंठे जागा स्वतंत्र वीज उपकेंद्रासाठी निश्चित करण्यात आली.


चंद्रकांतदादांच्या या पुढाकारामुळे बाणेर-बालेवाडी परिसराला विनाव्यत्यय वीजपुरवठा होतो आहे. यामुळे संपूर्ण कोथरूडलाच वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा मिळू शकला आहे.
मी कोथरूडचा, कोथरूड माझं असं म्हणणाऱ्या आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूडसाठी केलेल्या असंख्य कामांपैकी या लखलखीत कामामुळे कोथरूडकरांनाही निश्चितच अमाप समाधान लाभलं आहे.

See also  संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न