पंजाबी गायक दलजीत दोसांस यांच्या विनापरवाना कार्यक्रमाला विजय डाकले यांचा विरोध

कोथरूड : पंजाबी गायक दलजीत दोसांस यांच्या विनापरवाना कार्यक्रमाला विरोध विजय बापू धाकले यांनी विरोध दर्शवला आहे.


आज कोथरूड भागात सुप्रसिद्ध पंजाबी गायक दलजीत दोसान यांचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट दिली असता मोठ्या प्रमाणात मद्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आल्याचे दिसून आले. कार्यक्रमाला चाळीस हजार पेक्षा जास्त तरुण मुले मुली उपस्थित राहणार असल्याचे समजले परंतु अग्निशमन यंत्रणेची कुठलीही व्यवस्था किंवा परवानगी नाही. पार्किंगची कुठलीही व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. याबाबतीत कार्यक्रम स्थळी भेट देऊन संयोजकाशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही बोलण्यास तयार नाही हे अत्यंत गंभीर असून अशा प्रकारे विनापरवाना कोथरूडकारांना आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास देऊन कार्यक्रम होत असेल तर स्थानिक नागरिक म्हणून याला आमचा विरोध आहे असे बापू डाकले यांनी सांगितले.

अशा प्रकारचे पत्र संबंधित पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकारी यांना भेटून दिले. परवानगी घेऊन कायदेशीर रित्या जर कार्यक्रम होत असेल तर त्याला आमचा कुठलाही विरोध असण्याचे कारण नाही परंतु कायदा पायदळी तुडवून कोथरूडकारांना जर त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर कार्यक्रमात घुसून कार्यक्रम बंद पाडू असा इशारा बापू डाकले यांनी संबंधित आयोजक व प्रशासनाला दिलेला आहे.

See also  परभणी व नांदेड जिल्ह्याला मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका ; छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी व इतर पक्षांची एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा