कोथरूड येथील दिलजीत दोसांझ च्या म्युझिकल कॉन्सर्टला चंद्रकांत दादा पाटील यांचा विरोध

कोथरूड : पुण्यात कोथरूड मधील काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ च्या music concert ला  स्थानिक आमदार म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांनी विरोध दर्शवला आहे.

चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, पुण्यात कोथरूड मधील काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ कार्यक्रमाला स्थानिक आमदार म्हणून व एक नागरिक म्हणून माझा विरोध आहे.
फक्त दारू विक्रीसाठी विरोध नाही तर या कार्यक्रमा मुळे होणाऱ्या ट्रॅफिक जाम आणि कर्कश्य आवाजाला सुद्धा माझा विरोध आहे.

हा कार्यक्रम रद्द करा अशा सुचना मी पोलीस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग, आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

“असे कार्यक्रम समाजाला लागलेली किड आहे, त्यामुळे कोथरूड मध्ये हा कार्यक्रम. झाला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेल”

See also  ईदच्या दिवशी सार्वजनिक उद्याने बंद – मुस्लिम समाजाने व्यक्त केला तीव्र संताप, महाराष्ट्र मुस्लिम काँफरन्स तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन