बाणेर तेजस्विनी सोसायटी डीपी रोड येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर

बाणेर : बाणेर औंध विधाते वस्ती परिसरातील नागरिकांची आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन तेजस्विनी सोसायटी जवळ करण्यात आले होते. यावेळी फिरत्या दवाखान्यामध्ये सुमारे दीडशेहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली.

यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा उपाध्यक्ष मनोज दळवी, संजय काकडे, श्रेयस जाधवर, भास्कर जमदग्नी, प्रवीण नवले, विजय शिंदे, सुधीर अलकारी डॉक्टर साक्षी किंद्रे, सतीश तारू, मानसी यादव सानिका बाठे, साक्षी देशमुख, सिद्धेश्वर गाइंगर, आदी उपस्थित होते.

यावेळी आरोग्य शिबिरा अंतर्गत नागरिकांची मोफत रक्त तपासणी, बीपी, सीबीसी, कोलेस्ट्रॉल, शुगर, चेस्ट एक्स-रे आदी विविध तपासण्या करण्यात आल्या.

मनोज दळवी म्हणाले, आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे काम केले जात आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे हजारो रुपये बचत होत असून उत्तम आरोग्य सुविधा मिळत आहेत.

नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिराचे आयोजन कोथरूड मतदार संघाचे भाजपा उपाध्यक्ष मनोज दळवी यांनी केले होते.

See also  पुणेकर नागरिकांच्या सहकार्याने जी-२० बैठक यशस्वी करू - पालकमंत्री चंद्रकांत पाटील