बाणेर, बालेवाडी, सूस, महाळुंगे गावातील नागरिकांकरिता डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने दिवाळी सरंजाम वाटप

महाळुंगे : डॉ. दिलीप मुरकुटे यांच्यावतीने बाणेर, बालेवाडी, सूस, महाळुंगे गावातील गोरगरीब नागरिकांकरिता खास दिवाळीसाठी समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सरंजाम वाटप करण्यात आला. तसेच स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमातील मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी सरपंच नामदेव गोलांडे, गणपतशेठ मुरकुटे, राम गायकवाड, सोपानराव पाडळे, सोपानराव खैरे, विजय विधाते, राजेन्द्र मुरकुटे, डॉ. सतीश मराठे, श्याम बालवडकर, राजू शेडगे, पांडुरंग पाडाळे, भानुदास पाडाळे, हभप सुरेश बुवा पाडळे, रखमाजी पाडाळे, किरण मुरकुटे, गणेश मुरकुटे, ऋषी कांबळे, शिवकुमार नाईकवाडे, ऋषी लोढे, संतोष भोसले, सुमित कांबळे, ज्ञानेश्वर जाधव, दत्ता शेटे, सलिम सुतार, शिवाजी चिव्हे, महबूब शेख, सिद्धेश्वर हगवणे, सैपन शेख आणि परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, शिवसैनिक म्हणून काम करत असताना सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी आनंदी व्हावी म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गोरगरिबांसाठी गेली बारा वर्षे सरंजाम वाटपाचा कार्यक्रम करत आहोत. शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. मराठा आरक्षण साठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. त्यांना पाठिंबा दर्शवत कोणत्याही राजकीय नेत्याला न बोलावता केवळ गोर गरिबांची दिवाळी गोड करावी यासाठी खंड पडू नये म्हणून सरंजाम वाटप कार्यक्रम आयोजीत केला आहे.

यावेळी बोलतांना समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, दिलीप भाऊ मुरकुटे एक कुटुंब प्रमुख म्हणून सर्वसामान्यांची काळजी घेतात. सरंजाम वाटप करतांना चांगल्या प्रतीचा सरंजाम कसा देता येईल हे पाहतात. कोणत्या वस्तूची कमतरता पडू देत नाही. त्यांच्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी दर वेळी गोड करतात.

यावेळी उपस्थित महिलांनी मोठया आनंदाने सरंजाम घेत सांगितले की, भाऊ आम्हाला प्रत्येक वेळी दिवाली सरंजाम देत आमची दिवाळी गोड करतात. तसेच बाणेर येथे मुस्लिम बांधवांसाठी ईद सरंजाम वाटप करणारे दिलीप भाऊ मुरकुटे हे पहिले व्यक्ती असल्याची भावना मुस्लिम भगिनींनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

See also  डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य पुस्तक वाटप करुन जयंती साजरी.