हांडेवाडी रोडवरील ईशा एम्पायर सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर

हडपसर : १५ ऑगस्ट या स्वतंत्रदिनी यासाठी ओम ब्लड सेंटर आणि ईशा एम्पाअर चे सोसायटी यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ३५ रक्तदात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.

हांडेवाड़ी रोड वरील ईशा एम्पायर सोसाइटीचे सचिव कुंजन वंदे, वाइस चेरमन नारायण बिरादार, जगताप जोसेफ, प्रवीण बढ़े, मुकेश डोडीया,शिवराज गविमथ, ज़ुल्फ़िकार कुरने, नितेश धोटे, इक़बाल सय्यद, उन्मेष मर्चँट, अश्विन झाड़े, विनोद काळे, संतोष दूधाने, स्वप्निल यावलकार, जे के राणा यांनी मेहनत घेतली.

यावेळी ओम ब्लड सेंटरचे डॉक्टर कर्मचारी ईशा एम्पायर सोसायटीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कुंजन वदे यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रेरणादायी विचार निर्माण व्हावे यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाज उपयोगी उपक्रमातून होत असलेला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

See also  माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रमाणे चोखपणे काम करावे- माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर