स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला गेल्याने निवडणुका लांबण्याची चिन्हे

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव विधानसभेमध्ये कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून मांडण्यात आला. हे विधेयक दोन्ही सभागृहात मांडून त्यावर चर्चा होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्यात याव्यात गेले अनेक वर्ष या निवडणुका रखडल्या आहेत यामुळे विरोधकांची निवडणुका घेण्याची मागणी आहे. परंतु सरकारच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्यामुळे निवडणुका लांबण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.

अनेक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदा पंचायत समिती तसेच नगरपरिषदा महानगरपालिका यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांचे प्रतिनिधित्व सध्या महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाही. या पार्श्वभूमीवर विधानसभेनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

परंतु सरकारच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे विधेयक मांडण्यात आल्याने सध्या तरी निवडणुका लांबणार असेच चित्र समोर येत आहे.

See also  पीएमपीएमएल बसच्या दरवाढीस आम आदमी पार्टीचा विरोध