एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धा पुणेकरांनी अनुभवला डर्ट-रेसिंगच्या अंतिम फेरीचा थरार !!

पुणे : फेडरेशन ऑफ मोटर स्पोटर्स क्लब्स ऑफ इंडिया (एफएमएससीआय) मान्यतेखाली होणार्‍या इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. रविवारी सकाळी झालेल्या या रॅली रेसिंगच्या अंतिम आणि निर्णायक फेरीमध्ये भारतातील अव्वल आणि सर्वोत्तम रायडर्सनी जबरदस्त चुरस दाखवित स्पर्धा गाजवली.

पुण्याजवळील कामशेत येथील नानोली स्पीड-वे फार्म्स येथे झालेल्या निर्णायकफेरीमध्ये देशातील ७० रायडर्सनी सहभाग घेतला आहे. या अंतिम फेरीसाठी एकूण १०० प्रवेशिका आल्या आहेत. या अंतिम फेरीमध्ये चैन्नई, बंगलोर, कोईमतुर, भोपाळ, गुवाहाटी, तामिळनाडूमधील ईरोड, त्रिसुर आणि कुर्ग, आसाम, कर्नाटक, केरळमधील एर्नाकुलम, शिमागोज, जयपुर या राज्यांतुन रायडर्स सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्रातील पुण्यामधून किशोर जाधव, मोहन सेठीया, पुरूषोत्तम मते, कुणाल सिंग, नितीश चौधरी, दानेश जोशी, पंकज ठक्कर, आदित्य राजपुत, बारामतीमधून रोहीत शिंदे, सांगलीमधून अजित पाटील, नाशिक मधून दर्शन चावरे, बादल दोशी (नवी मुंबई) असे अव्वल रायडर्स सहभागी झाले आहेत.

‘युरोग्रीप’ या आघाडीच्या टायर उत्पादक कंपनीने या रॅली चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीसाठी प्रायोजक्त्व दिले असून या स्पर्धेसाठी रायडर्सना टायर कंपनीच्यावतीने देण्यात आले.

See also  योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा संपन्न