मिलेनियम नॅशनल स्कुल, कर्वेनगर  लैंगिक अत्याचार प्रकरणी निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाची भेट

कर्वेनगर : मिलेनियम नॅशनल स्कुल, कर्वेनगर या शाळेतील शिक्षक गेल्या दीड वर्षांपासून शाळेतील मुलांवर लैंगिक अत्याचार करत आहे याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाची भेट घेवून त्यांना जाब विचारण्यात आला.

यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावास बळी न पडता दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर सदर प्रकरणामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भय निर्माण झाले असेल तर त्यांची मानसिकता जपावी असे सांगण्यात आले.


 यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, ॲड. अभय छाजेड, अजित दरेकर, सुजाता शेट्टी, सदानंद शेट्टी, लता राजगुरू, प्राची दुधाने, संदिप मोकाटे, राज अंबिके, सुजित यादव, अर्चना शहा, शारदा वीर, ब्लॉक अध्यक्ष रविंद्र माझीरे, अक्षय माने, विशाल जाधव, रामदास केदारी, मनीषा करपे, अशोक लोणारे, अविनाश अडसुळ, राजाभाऊ नखाते, विवेक कडू, किशोर मारणे, भगवान कडू, प्रथमेश लभडे, प्रकाश पवार, सचिन भोसले आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

See also  संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन