औंध येथे रक्तदान शिबिरामध्ये 116 दत्त भक्तांचे रक्तदान

औंध : गुरुदेव दत्त जन्म सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्याला पिंपरी चिंचवड ब्लड सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आले.

या सोहळ्याला दत्त भक्त आणि औंध गावांतील तरुण आणि महिला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .या निमित्ताने प्रमुख उपस्थिती सनी निम्हण, अँड मधुकर मुसळे, नगरसेविका अर्चना मुसळे मनसे नेते रणजित शिरोळे नाना वाळके, औंध गाव ह.भ.प सोमनाथ बोर्ड ह.भ.प.अमित क्षिरसागर, मन से विभाग अध्यक्ष विनायक कोतकर, दत्ता रणदिवे, विश्वस्त मंडळ मा. अध्यक्ष योगेश जुनवणे, विश्वस्त महेंद्र जुनवणे, किरण लांडगे बरेच मान्यवर उपस्थित होते. ११६ दत्त भक्त परिवारातर्फे रक्तदान करण्यात आले‌.  सुर्यमुखी दत्त मंदिर अध्यक्ष अँड सतिश रानवडे आयोजन नियोजन मनसे नेते निलेश जुनवणे, अभिषेक जेऊर यांनी केले.

See also  भाजपने आरक्षण संपवले  – सुनील माने