औंध गोळवलकर गुरुजी शाळेत भाजपा व पतंजली योगपीठ च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

औंध : 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस औंध येथे भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने साजरा करण्यात आला.

शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे व पतंजली योग पिठाच्या योगशिक्षकांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, माजी स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब रानवडे,सचिन वाडेकर उपाध्यक्ष व योग दिन प्रमुख ,सरचिटणीस गणेश बगाडे, औंध नगर कार्यवाहक रतुलजी हालदार, कोथरूड भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष प्रकाश बालवडकर, सचिन मानवतकर ,हरीश अंघोळकर ,सेविका समितीच्या गौरीताई देशपांडे ,सागर गुजर ,मदनजी कुलकर्णी ,बिल्लूसिंग मान, सुनील शिंपी हा कार्यक्रम पतंजली योगपीठाच्या योगशिक्षिका चित्राताई मोहड , सेजलताई भयानी ,हर्षदाताई आगरकर, प्रदीप खोले यांनी आयुष मंत्रालय व पतंजली योगपीठ यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्वसाधारकांकडून योग साधना करून घेतली .
यावेळी औंध भागातील निशुल्क योगा चे क्लासेस घेणाऱ्या योग शिक्षकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये औंध भागांमध्ये ज्यांनी योगाचा प्रचार प्रसार निशुल्क योग चालवले त्या चित्राताई मोहड ,योगशिक्षिका सेजलताई बियाणी, योगशिक्षिका मीराताई कामदार, योगशिक्षिका शकुंतलाताई मिरशी ,योगशिक्षक प्रदीपजी खोले, योगशिक्षिका अनुराधाताई दिघे, योगशिक्षिका हर्षदाताई आगरकर या सर्व योग शिक्षकांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला .
आलेल्या सर्व साधकांना सन्मानपत्र देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वाडेकर यांनी केले.

See also  पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी हरिष पाटणे यांची बिनविरोध निवड