बाणेर येथील सौ पूनम विशाल विधाते यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड

बाणेर :बाणेर येथील सौ पूनम विशाल विधाते यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड झाली. तसे नियुक्ती पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. महिला सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सतत देत असलेल्या योगदानाची पक्षाने दखल घेत विधाते यांना मोठी जबाबदारी दिली आहे.

सौ.पूनम विशाल विधाते(कार्याध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी ) म्हणाल्या, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुणे शहर महिला कार्याध्य्क्ष पदी माझी निवड झाली. खरंतर समाजासाठी काम करत असताना आपण पूर्णपणे झोकून देऊन काम करत असतो. लोकांना भेटत असतो, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्यप्रकारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण सामाजिक कामाला राजकीय किनार असेल तर कामांचा वेग दुपटीने वाढतो हा आजवर मी घेतलेला अनुभव आहे. आज महिलांसाठी महिलांचे प्रश्न मांडताना महिलांना सक्षम करण्यासाठी आपण पहिली सुरवात स्वतःपासूनच करायला हवी असं वाटतं. आज खऱ्या अर्थानं एक पाऊल पुढे जात एक नवीन आव्हानं, नवीन जबाबदारी घेत समाजपयोगी कामे करणार आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर महिला कार्याध्यक्ष पदी नेमणूक केल्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार,  प्रफुल पटेल , प्रदेशाध्यक्ष मा. सुनील तटकरे , महिला व बालकल्याण मंत्री मा. अदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष मा. रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रिया गदादे यांचे आभार सौ.पूनम विधाते यांनी मानले.

See also  जेजुरी येथे खंडेरायाचा सोमवती सोहळा सोमवारी