पुणे: छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा (SRTL) किल्ल्यांच्या परिसरात एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा शनिवार दि. ७ व ८ डिसेंबर २०२०४ रोजी संपन्न झाली. यंदाच्या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. सिंहगडाच्या पायथ्यापासून राजगड चढाई ते तोरणा किल्ल्यापर्यंत ते लिंगाणा सुळक्याच्या पायथ्यापर्यंत या मॅरेथॉनचा मार्ग दरवर्षी स्पर्धक पार करतात. भारतासहित साऊथ कोरिया, नॉर्वे, फ्रांस, स्पेन, साऊथ आफ्रिका, कॅनडा, पोलंड, या ८ देशातील खेळाडूंसह, भारतातील २७ राज्य आणि ५५ शहरातील एकूण ११०० हुन अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही मॅरेथॉन १०० किमी, ५३ किमी, २५ किमी व ११ किमी अशा वेगवेगळ्या विभागात आयोजित केली. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. शर्यतीत सहभागी होण्याऱ्या स्पर्धकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असून त्याचबरोबर प्रथामिक सोयी सुविधांची व्यवस्था केली गेली आहे. विजयी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व विशेष सन्मान चिन्ह दिले जाते. पश्चिम घाटातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात ही १०० किमीची मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धकांसाठी अविस्मरणीय अनुभव देणारी ठरली, तसेच २०२४ हे एक विशेष वर्ष ठरले आहे कारण यावर्षी चारही अंतर श्रेणींमध्ये नवीन विक्रमी वेळांच्या नोंदी झाल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.
एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन ही सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा किल्ल्यांना जोडणारी प्राचीन मार्गाची एक रोमांचकारी मॅरेथॉन असून स्पर्धेत गोळेवाडी (डोणजे) ते सिंहगड ११ किमी, डोणजे-सिंहगड ते राजगड २५ किमी, डोणजे-तोरणा ५३ किमी आणि डोणजे ते लिंगाणा १०० किमी अशा चार अंतर श्रेणीमध्ये ही स्पर्धा घेतली गेली. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन हे इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसियेशनची म्हणजेच ITRAचे सदस्य आहे. एसआरटी अल्ट्रा ही स्पर्धा वेळेत पुर्ण करणारया स्पर्धकांना फ्रांस मधील UTMB पात्रतेसाठी अवश्यक गूण मिळतात.
छत्रपती शिवरायांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगड, राजगड, तोरणा आणि लिंगाणा गडकिल्ल्यांच्या सानिध्यातील ही स्पर्धा पुर्वीच्या काळी प्रवास,व्यापार शेतीसाठी वापरलेला हा मार्ग ऐतिहासिक पाऊलखुणांची आठवण करून देणारा आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून स्वतःच्या आरोग्यासाठी व आनंदासाठी वेळ काढणे महत्त्वाचे झाले आहे. एसआरटीएल मॅरेथॉन सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आरोग्य अशा तिन्ही बाबींचा समन्वय साधणारी स्पर्धा आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग तसेच वन विभाग, पर्यटन विभाग, पुणे पोलीस व पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने हि स्पर्धा दरवर्षी यशस्वी पार पडते.
एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष दिग्विजय जेधे, विश्वस्त अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, मारूती गोळे, ऍड. राजेश सातपुते, हर्षद राव, अमर धुमाळ, व हवेली, दौंड, मुळशी, वेल्हा व पुण्यातील ५०० स्वयंसेवकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
यावर्षी दार्जिलींग चा हेमंत लिंबू याने १०० किमी अंतर १०ः३२ः३३ या वेळात पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम केला, ते सोम बहाद्दूर थामी याने ५३ किमी ५ः२३ः४३ या वेळात पूर्ण करून विक्रम केला. गुजरात चे इनेश वसवा ने २५ किमी २:१३ः४० या वेळात पूर्ण करून विक्रम केला व अमित शर्माने ११ किमी १ः१५ः१५ वेळात विक्रम नोंदवला. या स्पर्धेसाठी ऍथलीट ट्रेनिंग प्रोग्रॅम घेण्यात आला याचे नैतृत्व कोच योगेश सानप यांनी केले व त्यांना कोच अनंत कचरे व कोच श्यामल मोंडल यांनी सहकार्य केले.
SRT ULTRA 2024 निकाल
• सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा – एसआरटीएल १०० कि.मी. अंतर व ३८७० मी. चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – हेमंत लिंबू – १०ः३२ः३३ new record
क्र. २ – विशाल वाळवी – १२ः१६ः२१
क्र. ३ – रामदास मेस्त्री – १४ः५६ः३२
महिला विजेता –
क्र. १ – स्नेहल योगिता – १९:५०ः०२
क्र. २ – सुफिया सूफी – २०:४२ः१५
क्र. ३. – शर्वरी खेर- २२ः४४ः३६
• सिंहगड-राजगड-तोरणा – ५३ कि. मी. व २३२० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – सोम बहादूर थामी – ५ः२३ः४३ new record
क्र. २ – अभिनीत सिंग – ८ः०८ः२९
क्र. ३ – साई किरण एस – ८ः१३ः४९
महिला विजेता –
क्र. १ – ऋुतूजा माळवदकर – ८:१३:५६
क्र. २ – सहाना विश्वनाथ – ११:०३:४९
क्र. ३. – हेमा आवळे – ११:४०:४६
• सिंहगड-राजगड – २५ कि. मी. व ११०० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – इनेश वासवा – २:१३ः४० new record
क्र. २ – अनुराग कोणकर – २:१६ः४३
क्र. ३ – विशाल राजभर – २:२७ः४४
महिला विजेता –
क्र. १ – त्रूप्ती भोसले – ३:५३ः२७
क्र. २ – श्रद्धा वास्सा – ४:२१ः०५
क्र. ३. – श्वेता खेराज – ४:३८ः१३
• सिंहगड हाफ व्हर्टीकल कि.मी. – ११ कि. मी. व ७०० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – अमित शर्मा – १ः१५ः१५ new record
क्र. २ – भागवत धुमाळ – १:३०ः०८
क्र. ३ – डॅनियल सेयमोर – १:३७ः१३
महिला विजेता –
क्र. १ – निशा मिश्रा – १:४४ः१३
क्र. २ – शाबू गोसावी – १:४८ः२२
क्र. ३. – सुरभी मेरूकर- १ः५३ः५२
– वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन.
घर ताज्या बातम्या स्वराज्यच्या सुवर्णमार्गावर धावणारी चित्ताधारक एसआरटी अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनमध्ये ४ नवीन रेकॉर्ड