पणन प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी संचानालयाने ताकदीने काम करावे -पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे :- शेतकरी, आडते, व्यापारी तसेच हमाल शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीतील महत्वाचे घटक आहेत. शेतमालाला योग्य व वाजवी किंमत मिळावी हे पणन कायद्याचे वैशिष्टय आहे. शेतकऱ्यांचे काही मध्यस्थांकडून होणारे शोषण टाळण्यासाठी व पणन प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी पणन संचनालयाने ताकदीने काम करावे तसेच जागतिक बदलांचा वेध घेऊन,शेतकरी हितासाठी संचालयानाच्या कामात तातडीने सकारात्मक बदल घडवावेत. असे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.


मध्यवर्ती इमारत पुणे येथील पणन संचालनालयाला पणन मंत्री ना.जयकुमार रावल यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पणन संचालक विकास रसाळ, पणन सहसंचालक आर.एस.दराडे, श्रीमती स्नेहा जोशी, पणन उपसंचाक मोहन निंबाळकर, रविंद्र गोसावी यावेळी उपस्थित होते.

सहकारी ग्राहक संस्थाचे प्रश्न आणि मागण्या सोडविण्यासाठी राज्यस्तरावर संमेलन आयोजित करण्यात यावे, सर्वसोयींनीयुक्त मार्केट कमिटीची स्थापना, खाजगी बाजार समित्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आयोजित करावा असे सांगून मंत्री श्री.रावल यांनी विमान, रस्ते आणि समुद्रमार्गे जोडण्यात येणारे जागतीक दर्जाचे महामुंबई टर्मिनल मार्केट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पणन संचालनालयाच्या कामाकाजाचा आढावा मंत्री ना.रावल यांनी यावेळी घेतला. पणन संचालक विकास रसाळ यांनी पणन विभागाच्या नियोजित कार्याची माहिती दिली. बैठकीला पणन संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

See also  कुस्ती संघाच्या अध्यक्ष ला अटक करावी या महिला कुस्तीगिरांच्या मागणीला पाठिंबा देत आपची निदर्शने !