राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पदभार स्वीकारला

पुणे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काल (गुरुवारी) मंत्रालयात नगर विकास वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक या विभागाचा पदभार स्वीकारला.

संबंधित विभागाचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात आणि त्यांना सोयी सुविधा पुरवण्या संदर्भात कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

See also  बाणेर बालेवाडी भागात हिंदू नववर्ष निमित्ताने शोभायात्रा