बाणेर बालेवाडी भागात हिंदू नववर्ष निमित्ताने शोभायात्रा

बाणेर : गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाणेर बालेवाडी नगरातील नागरिकांनी शोभायात्रा काढण्यात आली.

समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यात भाग घेतला. महिला, पुरूष आणि बालगोपाळांचा विशेष सहभाग होता.

शोभायात्रा बालेवाडी गावातील विठ्ठल मंदिरापासून निघून बाणेर गावातील भैरवनाथ मंदिरात संपली. पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिववंदना करण्यात आली. शोभायात्रेच्या मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.

सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष आणि मोठ्या सोसायटीच्यांनी शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी गेली आठवडाभर परिश्रम घेतले.

 

See also  बारामती येथे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न