पुण्यामध्ये मराठा समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा, आरोपींना फाशीची शिक्षा व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : पुण्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, ज्योती मेटे यांच्या उपस्थितीत लाल महाल येथून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जन आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

या मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला सहभागी झाले होते.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, वाल्मीक कराड याची खुनाच्या आरोपांमध्ये देखील गुन्हा नोंद करावा.  वाल्मीक कराड नियोजनबद्ध पद्धतीने सरेंडर झाला या प्रकरणे सरकारमधील मास्टरमाईंड शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी मोर्चादरम्यान करण्यात आली.

पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये हजारो लाखो नागरिकांनी सहभाग घेतला होता.

See also  बाणेर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथ मराठा समाजाचा जल्लोष; मनोज जरंगे पाटील यांच्या भगिनी देखील सहभागी