घरकाम करणाऱ्या महिला आपल्या कुटुंबाचाच भाग – मंजुश्री खर्डेकर

पुणे : घरकाम करणाऱ्या महिला ह्या आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत असे समजूनच त्यांच्याशी वागले पाहिजे आणि त्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी झाले पाहिजे असे माजी नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.


तर आज संक्रातीच्या हळदीकुंकवाच्या निमित्ताने घरकाम करणाऱ्या गरजू भगिनींना साड्या वाण म्हणून देताना खूप आनंद होतं आहे असे भरत मित्र मंडळाच्या महिला उत्सव प्रमुख तेजस्विनी दाभेकर यांनी सांगितले.
भरत मित्र मंडळाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ व गरजू महिलांना साडी भेट देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ह्या दोघींनी हे मत व्यक्त केले.यावेळी भरत मित्र मंडळाचे संस्थापक बाळासाहेब दाभेकर,क्रिएटिव्ह फॉउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,उत्सव प्रमुख निरंजन दाभेकर,अनिल यनपुरे,चंदन बकरे इ मान्यवर उपस्थित होते.


घरकाम करणाऱ्या महिला ह्या कबाडकष्ट करून आपला संसार सावरत असतात तसेच त्या अनेक वेळा सणासुदीला सुद्धा धुणी भांडी, झाडू पोछा, कपडे धुणे इ कामं करत असतात, त्यांना क्वचितच सुट्टी मिळते, अश्या परिस्थितीत ह्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा यासाठी आम्ही असे उपक्रम राबवत असल्याचे सौ. मंजुश्री खर्डेकर आणि सौ. तेजस्विनी दाभेकर यांनी सांगितले. यावेळी 35 महिलांना साडी वाण म्हणून भेट देण्यात आली तर सुमारे 500 महिलांना हळदीकुंकू व भेटवस्तू वाण म्हणून देण्यात आल्या.

See also  इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) जनजागृती व प्रात्याक्षिक मोहिमेचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ