‘महाद्याचे रक्त म्हंमद्याला, रक्ताची गरज समद्याला’ असा सामाजिक समतेचा संदेश देत कोथरूडमध्ये ” शिरीष तुपे” यांच्या ३२ व्या स्मृतीदिना निमित्त भव्य रक्तदान शिबीर

पुणे : ‘महाद्याचे रक्त म्हंमद्याला, रक्ताची गरज समद्याला’ असा सामाजिक समतेचा संदेश देत कोथरूडमध्ये सामाजिक कार्याचे प्रेरणा स्थान स्वर्गीय ” शिरीष तुपे” यांच्या ३२ व्या स्मृतीदिना निमित्त अयोजित केलेल्या रक्तदान कार्यक्रमास १८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान कार्यक्रमात विषेश म्हणजे  ६७ वयाचे जेष्ठ शिवसैनिक श्री  अशुतोष मोकाशी यांनी रक्तदान केले . यावेळी केंद्रीय मंत्री खासदार- मुरलीधर अण्णा मोहोळ , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे अंकुश अण्णा काकडे , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक मानकर , मनसेचे  नेते गणेश सातपुते ,बाळा शेडगे ,अजय शिंदे ,रणजीत शिरोळे, सिनेअभिनेते रमेश (पिट्याभाई ) परदेशी , नगरसेवक राजाभाऊ बराटे , विश्राम कुलकर्णी, जयंत भावे ,शिवराम भाऊ मेंगडे , शिवसेना शहरप्रमुख गजानन  थरकुडे, दिलीपसिंग विश्वकर्मा , सुधीर धावडे, विजय डाकले ,अजय मारणे ,नवनाथ जाधव ,ऊमेश कंधारे ,अण्णा गोसावी , ऊमेश भेलके, जयदिप पडवळ , राजेश पळसकर,  वैभव दिघे , पत्रकार विजय गायकवाड , सागर येवले ,सागर जगताप , माऊली म्हेत्रे ,जितेंद्र मैड  राजकीय ,सामाजिक क्षेत्रांतील नागरिक यावेळी उपस्थित होते. 

“आम्ही ऊतनार नाही मातनार नाही घेतलेला सामाजिक कार्याचा वसा टाकणार नाही” हिच शिरीष तुपे यांना भावपुर्ण श्रध्दांजली असल्याचे यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजक व मनसे शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांनी सांगितले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना  व स्वर्गीय शिरीष तुपे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

See also  औंध डी मार्ट च्या पार्किंगच्या जागेत व्यवसाय यामुळे नागरिकांना करावे लागते रस्त्यावर पार्किंग