स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त लहान मुलांसाठी चित्र रंगकाम स्पर्धा आयोजन

पाषाण : सुतारवाडी पाषाण परिसरात हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त लहान मुलांसाठी चित्र रंगकाम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सनशाइन  स्कूलचे सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच उपविभाग प्रमुख संदीप जी सातव, सुतारवाडी शिवसेना शाखाप्रमुख अमोल फाले, शिवसैनिक दशरथ खेडेकर ,व शिवदूत महेश सुतार हे उपस्थित होते.

See also  राष्ट्रपती पुतिन व राष्ट्रपती चिनफिंग यांच्या मध्ये यूक्रेन संघर्ष विरामासंदर्भात चर्चा.