धायरी येथील रखडलेल्या सर्व चारही डीपी रस्त्यांसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचे आदेश

पुणे: धायरी गाव व सिंहगड परिसरातील रखडलेल्या चारही डिपी रस्त्यांसाठी कायदेशीर भुकंपादनासह सर्व कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आज महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संबंधित विभागाला दिले.रखडलेल्या डीपी रस्त्याच्या  निषेधार्थ  प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी सर्व पक्षीय नागरिकांच्या वतीने धायरी येथे  अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांसमवेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज बैठक झाली.


त्यावेळी आयुक्तांनी रखडलेल्या डीपी रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आदेश दिले अशी माहिती पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी दिली.प्रजासत्ताकदिनी अन्नत्याग आंदोलनाची  आमदार भिमराव तापकीर यांनी भेट घेतली. यावेळी आमदार  तापकीर तसेच पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. तसेच आठ दिवसांत ठोस कार्यवाहीचे आश्वासन दिले होते.

२८ वर्षांपासून रखडलेल्या धायरी गावातील डीपी रस्त्यांना कोणी वाली उरला नाही.वर्षानुवर्षे  डीपी रस्ते कागदावरच आहेत .
पर्यायी रस्ते नसल्याने धायरी गावासह इतर रस्त्यावर  वाहतूक कोंडीची गंभीर बनली आहे. रोजच्या वाहतूक कोंडीने  नागरिकांचे हाल सुरू आहेत.सिंहगड रोड ते धायरी सावित्रीगार्डन डी पी रोडसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही हा रस्ता कागदावरच आहे.तर काकासाहेब चव्हाण बंगला ते नऱ्हे,  बेनकर वस्ती ते नऱ्हे
व पारी कंपनी ते लक्ष्मी लाॅज हे तीन रस्तही कागदावर आहेत.

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, प्रशासनाने धायरी गावात ४ डीपी रस्त्यांचे नियोजन हे २८ वर्षांपूर्वी केले आहे. मात्र याबाबत कोणतीही हालचाल करण्यात येत नाही. काही ठिकाणी अर्धवट भूसंपादन करण्यातआले आहेत.धायरी गावातील सर्व चारही डि. पी. रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यावीत यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याची दखल घेत राज्य शासनाच्या मुख्य सचिवांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही प्रशासन सुस्त असल्याने अन्नत्याग आंदोलन करावे लागले.

यावेळी रूपाली चाकणकर, धनंजय बेनकर, राहुल पोकळे ,सनी रायकर ,निलेश दमीस्टे, नेताजी बाबर, विजय लायगुडे, चिंतामणी पोकळे, यशवंत लायगुडे, विकास कामठे, भाग्यश्री कामठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  सुसगावच्या रस्ता रुंदीकरणासाठी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांचे विशेष प्रयत्न