पिंपरी चिंचवड पालिकेतील अधिकाऱ्यांची नावे खड्ड्यांना देऊ आम आदमी पार्टी रवी काळे यांचा इशारा

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात शेकडो कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीचे स्वप्न पिंपरी चिंचवडकरांना दाखवण्यात आले परंतु सध्या शहराची खासकरून पिंपळे निलख, विशालनगर,रक्षक चौक,कस्पटे वस्ती या परिसरात जागोजागी असलेले खड्डे व पाणी साचलेले दिसते. यामुळे हीच का स्मार्ट सिटी असा प्रश्न आदमी पार्टीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

स्मार्ट सिटीचे कामाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवण्यात आली आहे.त्याच जागी अनेक मोठमोठे खड्डे पडलेले दिसतात .या संबंधीत प्रकार वेळोवेळी ड प्रभागातील जनसंवाद माध्यमातून मांडण्यात आला परंतु प्रशासक असल्याने या अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्यास कारणीभूत असणाऱ्या ठेकेदारांना नेमके शहरातील रस्त्यांवर पाणी साचवण्याचे काम दिले होते की रस्ते स्मार्ट करण्याचे काम दिले होते याची चौकशी मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी करावी.

आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडून निषेध व्यक्त करण्यात आला. येत्या दोन दिवसांत शहरातील खड्डे बुजवण्यात आले नाही तर खड्यांमध्ये झाडे लावू अन्यथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावाने या खड्ड्यांचे नामकरण करू असा इशारा आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी दिला .

See also  वारकऱ्यांना पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासह सुरक्षेची काळजी घ्या- जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे