पिंपरी-चिंचवड शहरात विविध विकास कामे आणि प्रकल्पांचे ई-भूमिपूजन व लोकार्पण

पिंपरी : मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड, म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व पोलीस विश्रामगृह देहुरोड, पुणे पोलीस अधीक्षक या इमारतींचा भुमीपूजन तसेच प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय मधील शिवनेरी सभागृहाचे उद्घाटन  करण्यात आले. पिंपरी येथील भूखंडावरील मध्यवर्ती अग्निशामक केंद्र आणि अग्निशामक प्रबोधिनी इमारत,  आकुर्डी प्राधिकरण येथील हेडगेवार भवनजवळील अग्निशमन केंद्र, पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे दरम्यान जोडणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमीपूजन तसेच मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड, २४ मी. डी.पी रस्ता, सिल्व्हर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड १८ मीटर डी.पी रस्ता तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 

स्मार्ट सिटीच्या वतीने जीआयएस आधारित ईआरपीअंतर्गत कोअर ॲप्लिकेशन (सॅप). नॉन कोअर ॲप्लिकेशन, ई-ऑफिस (डीएमएस) आणि भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये विकसित केलेल्या संगणक प्रणाली, तालेरा रुग्णालय नवीन इमारत, शहरातील विविध ठिकाणी ‘वेस्ट टू वंडर’टाकाऊ वस्तूंपासून निर्मित केलेल्या टिकाऊ कलाकृती, महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतीवर बसविण्यात आलेल्या रुफ टॉप सोलर प्रणालीचे लोकार्पण तसेच सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन उपक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे स्वयंचलित होर्डिंग शोध व सर्वेक्षण प्रणाली उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मुलांना गुन्हेगारी वृत्तीपासून दूर ठेवण्यासाठी दिशा उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आले. सायबर गुन्हेगाराचा तपास करणाऱ्या तसेच दहशतवाद विरोधी पथकातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

श्री. सिंह यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत करण्यात येणारी विविध विकासकामे आणि प्रकल्पाबाबत माहिती दिली. तर श्री. चोबे आणि श्री.देशमुख यांनी नवीन इमारतीबाबत प्रास्तविकात माहिती दिली.  उपस्थित मान्यवरांचे आभार अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मानले.

See also  राष्ट्रपतींनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे