पुणे : BRT बस स्टॉप येथे येणाऱ्या बसेस कोणत्या स्टॉपला जाणार आहेत याबद्दल दिशा दर्शक इलेक्ट्रॉनिक गॅजेट लावण्याची मागणी पतित पावन संघटनेचे विजय विठ्ठल क्षीरसागर यांनी केली आहे.
नागरिकांसाठी कात्रज स्वारगेट रस्ता BRT बस सेवा चालू केली आहे त्याचे स्वतंत्र रस्ते असताना इतर वाहने त्यातून जात असतात त्यांच्यावर कारवाई चे पत्र व्यवहार ट्रॅफिक डिव्हिजनला करण्यात यावा तसेच बस येताना दिसते पण ती कोणत्या पुढील स्टॉपला जाणार आहे हे दिसत नसल्याने बस स्टॉप येथील जमलेले नागरिक बस पाहण्यासाठी पुढील नागरिकांना ढकला ढकली करत असताना दिसत आहेत. अनेक नागरिक बस पाहताना खाली रस्त्यावर पडलेले आहेत. याची कित्येक उदाहरण आहेत. यात जेष्ठ नागरिक, कॉलेजला जाणारी मुले, मुली, महिला वर्ग सर्व कामगार वर्ग यांना सकाळी जाताना व सायंकाळी येताना याचा नाहक त्रास होत असताना दिसत आहेत याबाबतीत संघटनेस तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
बस स्टॉप येथे कोणत्याही प्रकारची दुर्घटना/अपघात घडूनये याकरिता आपण बस स्टॉप येथे येणाऱ्या बस संदर्भात दिशा दर्शक इलेक्ट्रॉनिक गॅजेट बोर्ड लावण्यात यावा व नागरिकांना होणारा त्रास व होणारा अपघात टाळावा. यावर लवकरात लवकर PMPML प्रशासनाने नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा व सेवा पुरवण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे.