कोळवडी वेल्हे येथेमोफत आरोग्य शिबिर संपन्न


पुणे : स्व. पै.बंडू कृष्णा चोरगे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, माय माऊली केअर सेंटर पुणे, एच व्ही देसाई हॉस्पिटल महम्मद वाडी पुणे, नेत्र रुग्णालय ससून हॉस्पिटल पुणे समता फाउंडेशन मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया मोफत जनरल मेडिकल तपासणी असे भव्य आरोग शिबिर मौजे कोळवडी तालुका वेल्हा जिल्हा पुणे, येथे उत्साहात पार पडले.

परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 122 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी 15 नागरिकांची नोंद झाली.असे अनेक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला
या कार्यक्रमाला उपस्थित लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज चे संस्थापक व झोन चेअर पर्सन ला.विठ्ठलराव वरुडे पाटील, ला. विलास आवटे आयोजक संतोष चोरघे आणि मित्र परिवार सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

See also  कै. गेनबा म्हस्के मैमोरियल ट्रस्ट शारदीय नवरात्र उत्सवामध्ये कळस म्हस्केवस्ती याठिकाणी एकवीरा देवीचे मंदिर उभारण्यात आले