लिटिल मिलेनियम स्कूल, बालेवाडी येथे शिवजयंती उत्सवाचे उत्साहात आयोजन

बालेवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती, त्यांची शौर्यगाथा संस्कारक्षम बालवयात लहान मुलात रुजावी म्हणून  लिटिल मिलेनियम स्कूल, बालेवाडी येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शाळेच्या डायरेक्टर सौ हेमलता कानडे, भाजप कोथरूड विधानसभा पदाधिकारी सौ कल्याणी टोकेकर (उपाध्यक्ष, उत्तर मंडल) , सौ हर्षदा थिटे (प्रभाग सरचिटणीस) , सौ निकिता माताडे ( सचिव, उत्तर मंडल) आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिली, ऐतिहासिक वेशभूषा करून आलेल्या लहानमुलांनी “जय भवानी, जय शिवाजी” अशा दिलेल्या घोषणांनी सगळ्यांचा उत्साह वाढला.
शिक्षकांनी “शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध” हे नाटक सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पूजना नंतर मोठ्या शिवदिंडी चे आयोजन केले.यात १५० विद्यार्थां आणि २० शिक्षकांनी भाग घेतला.सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, बक्षीस आणि खाऊ देण्यात आला.

See also  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा अभियान बाणेर संस्थेच्या माध्यमातून एक हजार झाडांचे वृक्षारोपण