एक पोळी होळीची सामाजिक बांधिलकीची’ ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुडमध्ये उपक्रम

कोथरूड : दुष्ट आणि वाईट प्रवृत्ती नष्ट करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक घरात पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य केला जातो. होलिका दहन झाल्यानंतर प्रत्येक घरातून एक पोळी होळीला अर्पण केली जाते. होळीच्या अग्नीमध्ये दृष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा’ हा त्यामागचा उद्देश असतो.

हे अन्न जळून खाक होण्याऐवजी ते गरीब आणि अर्धपोटी झोपणार्‍यांच्या मुखात जावे या उद्देशाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, ‘एक पोळी होळीची, सामाजिक बांधिलकी’ची हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून २० हजार पोळ्यांचे संकलन झाले असून, या सर्व पोळ्या गरीब विद्यार्थी, अनदेण्यात आल्या.

कोथरुड हे विद्येचे माहेरघर असल्याने, देशभरातून लाखो विद्यार्थी हे इथे शिक्षणासाठी येत असतात. यामधील असंख्य विद्यार्थी गरीब आणि अल्पभूधारक कुटुंबातील असल्याने, त्यांना अनंत अडचणींवर मात करत आपले शिक्षण पूर्ण करावे लागते.

यामध्ये असंख्य विद्यार्थी हे अर्धपोटीच शिक्षण घेत असल्याने, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना पोषक आहाराचे डबे सुरु केले आहेत. होळीच्या सणाचा आनंद देखील या विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एक पोळी होळीची समाजिक बांधिलकीची हा उपक्रम हाती घेत, कोथरुडमधील प्रत्येक कुटुंबांना गरीब विद्यार्थ्यांसाठी पोळी दान करण्याचे आवाहन केले होते.

ना. पाटील यांच्या आवाहनानंतर २० हजार पोळ्यांचे संकलन झाले. या सर्व पोळ्या गरीब विद्यार्थ्यांना देऊन, त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यात आला. यावेळी भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांच्या हस्ते या पोळ्यांचे वितरण केले गेले.

See also  पवना नदी पात्रात कल्पतरु कन्स्ट्रक्शन यांचे ब्ल्यू लाईन मधील  बांधकाम जमिनदोस्त करा मुख्यमंत्री यांना भेटून निवेदन दिले