प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी

पाषाण : प्रभाग क्रमांक ०९ येथे क्रांतिवीर लहूजी साळवे यांची २३१ वी जयंती उत्साह आणि श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत लहूजी साळवे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब भांडे – शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक, मयूर भांडे – युवासेना उपशहरप्रमुख. सरपंच महाळुंगे गाव, संतोष तोंडे – विभाग प्रमुख, अशोक दळवी , ज्योती चांदेरे , महेश भीमराव सुतार, करण कांबळे, राजेंद्र जमदळे, अशोक पवार, आनंद भांडे, रोहन गव्हाणे, आदेश सुतार, संकेत लोंढे, महेश भांडे , आदेश भदर्गे, संकेत  डेंगळे, अविनाश आंबुरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात क्रांतिवीर लहूजी साळवे यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण करून देत समाजातील एकात्मता, प्रेरणा आणि समाज उभारणीचे संदेश देण्यात आले.

See also  महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन