पौड : पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुळशी तालुक्याच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे, महिला आघाडी सहसंपर्क संघटक स्वाती ढमाले,शिवसेना मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, शिवसकार सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अशोक कांबळे, युवा नेते विशाल शेळके, भारतीय विद्यार्थी सेनेचे सचिव मुकेश लोयरे, युवा नेते प्रदीप कालेकर, आबा रनवरे उपस्थित होते.