पुणे : सध्याच्या काळात अतिशय गंभीर असलेल्या पाणी आणि हवेचे प्रदूषण या समस्यांवर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे शक्य असल्याचे सिद्ध करणारे प्रात्यक्षिक ‘इको आईस’च्या वतीने बोट क्लब येथे आज सादर करण्यात आले.
यावेळी प्रोजेक्ट ड्रॉपलेट आणि जलशुद्धी या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. प्रोजेक्ट ड्रॉपलेटद्वारे सौर ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे बोटीचा वापर करून नदी व अन्य जलस्त्रोतांमधील पाण्याची शुद्धता, प्रदूषणाचे प्रमाण आणि अन्य पर्यावरणीय परीक्षण केले जाते. पाण्यातील परिसंस्थेची संबंधित माहिती त्वरित डॅशबोर्डवर उपलब्ध होते. फ्लुईड ऍनालिटिक्सच्या सहकार्याने हा प्रकल्प विकसित करण्यात आला असून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कडून सन 2024 चे को प्रोन्युअर ऑफ द इयर हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे, अशी माहिती ‘इको आईस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ करण चव्हाण यांनी दिली. यावेळी विद्या प्रतिष्ठान च्या संचालक रजनी इंदुलकर, अतुल चंद्र, श्रुती बापट आदि मान्यवर उपस्थित होते.
तसेच पाण्यातील दूषित भाग जाळून टाकून आरओ तंत्रज्ञानाद्वारे त्याला पिण्यायोग्य बनवणाऱ्या जलशुद्धी या यंत्रणेचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. ही यंत्रणा घरगुती वापरापासून ते मोठ्या जलसाठ्यापर्यंत पाणी शुद्ध करण्यासाठी वापरता येणे शक्य आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा पुनर्वापर करणे आणि पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे, असा दावा डॉ. चव्हाण यांनी केला. पाण्याप्रमाणेच ड्रोनचा वापर करून हवा शुद्ध करण्याचे तंत्रज्ञानही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
रजनी इंदुलकर म्हणाल्या, शुद्ध पाणी, प्रदूषित हवा आणि अनिर्बंध कचरा या सध्याच्या काळातील मोठ्या समस्या असून त्यापैकी हवा आणि पाणी शुद्ध करण्यासाठी संशोधन करून तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या तरुणांचे हे कार्य कौतुकास्पद असून त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे,























