बाणेर बालेवाडी परिसरातील पावसाळी गटारांची स्वच्छता करण्याबाबत सहाय्यक आयुक्त यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन

बाणेर : बाणेर बालेवाडी परिसरातील पावसाळी गटारांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी योग्य पद्धतीने करण्यात यावी याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने जीवन चाकणकर यांनी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना निवेदन दिले.

मागील काही वर्षांमध्ये पावसाळ्याच्या काळात आपल्या बाणेर बालेवाडी भागात  नाले व गटारे भरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, नाल्यांना पूर येणे, गटारे तुंबणे त्यामुळे नागरिकांच्या जीवितास व आरोग्यस धोके निर्माण होणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे यावर्षी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आज बाणेर बालेवाडी परिसरातील पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई करण्याचे निवेदन बाणेर बालेवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने औंध क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त. गिरीश दापकेकर  यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळीच माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, जीवन चाकणकर, पवन खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  खडकी शिक्षण संस्था मध्ये पालखी सोहळा उत्साहात संपन्न!