कोथरूड : कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ चे माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या माध्यमातून आरोग्य सेवकांना रेनकोट वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक दीपक पोटे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, प्रतिक देसरडा, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, ॲड. मिताली सावळेकर, माजी नगरसेवक जयंत भावे, प्रशांत हरसुले, गिरीश खत्री, अमोल डांगे, दीपक पवार, ॲड. प्राची बगाटे, मंदार बलकवडे, अनुराधा एडके, आशिष काटे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि आरोग्य सेवक उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, समाजाची गरज ओळखून योजना राबविणे, हा माझा नेहमीच आग्रह असतो. त्या अनुषंगाने कोथरुडमध्ये विविध प्रकारचे सेवा प्रकल्प सुरू आहेत. दीपक पोटे यांनीही असेच उपक्रम राबविले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.