पाषाण : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राहुल कोकाटे मित्र परिवार, लोकसेवा प्रतिष्ठान, ओंकार योग साधना केंद्र,नवचैतन्य हास्य क्लब,अमृतवेला योग, टेम्पल योगा व भारतीय जनता पार्टी, पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसेवा स्कूल,सुस रोड,पाषाण येथे परिसरातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी राहुल कोकाटे, रामदास ठोसर, राजकिशोर त्रिपाठी, प्रकाश तात्या बालवडकर, सुहास सोनवणे, रत्नाकर मानकर, आनंद करमरकर, रघुनाथ उत्पात, उत्तम जाधव, प्रमोद कांबळे, निशा शिर्के, पाटील, विनया विध्वंस, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात योगासनाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी राहुल कोकाटे व मयुरी कोकाटे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी पाषाण, सुतारवाडी, सुसरोड परिसरातील नागरिक उपस्थित होते.