बावधन परिसरात नो पार्किंग फलक लावण्यात यावेत मनसेची मागणी

बावधन : बावधन परिसरातील मुख्य असणाऱ्या एन.डी.ए-पाषाण रोडवर एन.डी.ए चौक(चांदणी चौक) ते भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड पर्यंत (डॉक्टर होमी भाभा रोड) सम-विषम तारखेस वाहन लावण्यासंदर्भात तसेच येथे वाहनतळ नाही (नो पार्किंग)अश्या प्रकारचे फलक नसल्यामुळे नागरिक संपूर्ण रस्त्यावर चारचाकी, तीनचाकी, दुचाकी वाहन लावून दुकाने, कार्यालयामध्ये आपले काम करण्यासाठी जात असतात परंतु ते पुन्हा येई पर्यंत बावधन वाहतूक विभागाचे पोलीस त्यांची गाडी उचलून घेऊन जातात. यामुळे अनेकदा नागरिक व पोलिसांचा विसंवाद पाहायला मिळतो.


वाहनतळ नाही (नो पार्किंग), सम-विषम वाहनतळ फलक नसल्यामुळे नागरिकांची गोंधळाची परिस्थिती होत आहे. नागरिक व वाहतूक पोलिसांमध्ये रोजच वादाचे खटके उडत आहे. त्यामुळे नागरिक सतत आमच्या कार्यालयात येऊन तक्रारी करत आहेत.
तरी येत्या ८ दिवसामध्ये एन.डी.ए-पाषाण रोडवर(डॉक्टर होमी भाभा रोड) सम-विषम तारखेस वाहन लावण्यासंदर्भात व जेथे वाहनतळ नाही (नो पार्किंग) तेथे फलक लावून द्यावेत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.

याबाबत महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे व ठाणे अंमलदार, बावधन वाहतूक विभाग, पुणे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले  यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, गणेश साळी, राजेंद्र वेडेपाटील, किरण जाधव, दीपक नलावडे, प्रेमनाथ उमाप, सुभाष आमले, विजय ढाकणे, किरण काकडे, शिवम दळवी, तानाजी गाडेकर, अजय नेवसे, रोहिदास चांदेरे, रवी राठोड, कृष्णा उरणकर, विकास मोहिते, संतोष नागरे, युनूस शेख, राजू फुके, संदेश कांबळे, बाळू गोरगळ, किशोर इंगवले व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

See also  जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची तिसरी बैठक