धायरी : धायरी येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खडकवासला विधानसभा काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जातिभेद निर्मूलन अस्पृश्यता निवारण स्त्रियांचा उद्धार बहुजनांचा शिक्षण विकास औद्योगिक प्रगती शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे, आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने अपेक्षित वंचित समाजासाठी वापरणारे आणि आरक्षणाचे प्रणेते असणारे लोकराज्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज असे प्रतिपादन चव्हाण पाटील यांनी केले.
यावेळी उपस्थित माजी सरपंच संदीप अण्णा चव्हाण, पुणे शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील, बारामती लोकसभा उपाध्यक्ष सुरेश मते, किसन काँग्रेस चे हवेली तालुका अध्यक्ष रघुनाथ यादव, शिवाजी पोकळे,विश्वजीत जाधव, राजाभाऊ कुंभार आदी उपस्थित होते.