बँक ऑफ इंडियातर्फे प्रधानमंत्री धन — धान्य योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यामध्ये सहभाग- बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कर्नाटक

पुणे :  केंद्र शासन पंतप्रधान धन – धान्य योजना 2025–26 पासून पुढील 6 वर्षे 100 जिल्ह्यात राबविली जाणार आहे. त्यासाठी बँक ऑफ़ इंडिया च्या सर्व शाखाना सक्रिय सहभाग घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रजनिश कर्नाटक यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना दिली.
बँक राष्ट्रीयकरण दिवसाच्या निमित्ताने बँक ऑफ़ इंडिया संपूर्ण देशभर किसान दिवस साजरा करण्यात येत असतो. त्यानिमित्ताने बँक ऑफ इंडिया, पुणे विभागीय कार्यालय तर्फ़े शनिवारी खेड शिवापूर येथील नक्षत्र हॉलमध्ये विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी  श्री रजनिश कर्नाटक आले होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.

तत्पूर्वी नक्षत्र हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास 700 हुन अधिक शेतकरी उपस्थित होते.या कार्यक्रमात बँकेकडून एकूण 250 कोटी रुपयांचे कृषी कर्जवाटप पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि बचतगटांना श्री रजनिश कर्नाटक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेंच 22 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याचे पत्र वाटप करण्यात आले. यावेळी कृषी कर्ज लाभार्थ्यांना ए आय सक्षमी ड्रोन, ऊसतोडणी यंत्र, कंबाईन हार्वेस्टर आणि रेफ्रिजरेटेड व्हॅन्स यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कृषी तंत्रज्ञान व अन्नप्रक्रिया उपकरणाचे प्रदर्शन आणि विषय तज्ज्ञशी शेतकऱ्यांचा थेट संवाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी बैंक ऑफ़ इंडिया च्या पुणे विभागाचे चिफ जनरल मॅनेजर श्री प्रमोद कुमार द्विबेदी, पुणे विभागाचे झोनल मॅनेजर संजय कदम, मुख्य कार्यालयाचे जनरल मैनेजर (ग्रामीण विभाग) नकुला बेहरा व विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बँक ऑफ इंडियाच्या पुणे विभागाच्या फिल्ड जनरल मॅनेजर कार्यालयाने मार्च 2026 पर्यंत 13 टक्के वार्षिक व्यावसायिक वाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुणे विभागात 95 शाखा असून, त्यांच्यातर्फे आत्तापर्यंत 37 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करण्यात आला आहे.पुण्यातील फिल्ड जनरल मॅनेजर ऑफिस अंतर्गत 644 शाखा कार्यरत आहेत. फिल्ड जनरल मॅनेजर ऑफिस अंतर्गत कृषी कर्जाचे प्रमाण ठरविलेल्या उद्दिष्टपेक्षा 30 टक्के जास्त आहे.

See also  मुख्यमंत्र्यांनी कोरटकर प्रमाणे आर एस एस चे भैय्याजी जोशी चिल्लर असल्याचे जाहीर करावं -उद्धव ठाकरे

बँक ऑफ इंडियाचा 31 मार्च 2025 अखेर पर्यंत सर्व देशभरातील शाखा मधून एकूण व्यवसाय 14 कोटी 83 लाख कोटीवर गेला आहे. 2024-25 मध्ये बँकेने 9 हजार कोटी रुपयापेक्षा अधिक निव्वळ नफा कमावला आहे. बँकेच्या संपूर्ण देशभरात 5 हजार 300 हुन अधिक शाखा आणि या शाखामध्ये 50 हजारपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. बँक ऑफ इंडियातर्फे स्टार सखी योजना तसेच विविध कृषि विषयक योजना यशस्वीपणे राबवली जात आहे.