कोथरूड मध्ये “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” व “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२५” अन्वये विविध उपक्रम

कोथरूड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभाग,स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था वतीने सरस्वती विद्यामंदिर प्रशालेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता अपनाओ बिमारी भगाओ” व “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२५  अन्वये  प्रभाग क्रं. १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठी अंतर्गत डहाणूकर कॉलनी, लक्ष्मी नगर वसाहत व कोथरूड गावठाण परिसरामध्ये “स्वच्छता जनजागृती अभियान व विद्यार्थ्यांच्या मार्फत कचरा वर्गीकरण” याविषयी नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले.

तसेच लक्ष्मी नगर वसाहतीमधील नागरिकांना कचरा वर्गीकरण कशा पद्धतीने करायचा याविषयीचे घरो घरी पत्रके वाटण्यात आली. सदर स्वच्छता अभियान प्रचारफेरी मध्ये सरस्वती विद्या मंदिर १०० विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, सफाई कर्मचारी व स्वच्छ सहकारी संस्थेचे सर्व समन्वयक सहभागी झाले होते.सदर प्रचार फेरीमध्ये “ओला सुका कचरा वेगळा करू, पर्यावरणाचे रक्षण करू, प्लास्टिक पिशव्या वापरू नका कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करा, पान तंबाखू गोवा गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, नदी नाल्यांमध्ये कचरा टाकू नका,आपले आरोग्य धोक्यात आणू नका, झाडे लावा झाडे जगवा इत्यादी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.

सदर स्वच्छता प्रचार फेरी अभियान घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ कार्यालय क्रं. २, उपायुक्त अरविंद माळी महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमुख आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार यांच्या निरीक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, अशोक कांबळे, परेश कुचेकर, प्रवीण कांबळे, दत्ता कांबळे, कुणाल जाधव सरस्वती विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोल्हे सर तसेच स्वच्छ सहकारी संस्थेचे समन्वयक सोहन  खिलारे,अक्षय रूपटक्के,पूनम सराटे,माधुरी श्रीखंडे, कविता मदने, वैशाली घरटे, शुभम भुवड, अजय बनसोडे,सुलभा मकवाण, करूणा रणसिंग इत्यादी उपस्थित होते.

See also  ‘वारकरी संख्येचा अंदाज घेऊन चोख नियोजन करा’ - केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रशासनाला निर्देश