हौशी गायक कलाकारांसाठी २०वी पुणे आयडॉल स्पर्धा रंगणार

पुणे:- सोमेश्वर फाउंडेशन, पुणे आयोजित महाराष्ट्रातील हौशी गायक कलाकारांसाठी पुणे आयडॉल या स्पर्धेचे दिनांक 8 ते 14
मे दरम्यान पुण्यात आयोजित करण्यात येत आहे. सन 2002 स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली
ही स्पर्धा यंदा विसाव्या वर्षी सोमेश्वर फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण आयोजित करतआहेत.

प्रसिद्ध गायक रवींद्र साठे, प्रभा अत्रे, महेश काळे, शौनक अभिषेकी, वैशाली सामंत, राहुल देशपांडे अशा अनेक मान्यवरांनी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहून कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. कोमल कृष्णा, सौरभ साळुंखे, तुषार रिठे, अशा अनेक स्पर्धेत यश मिळवलेल्या गायक कलाकार चित्रपट क्षेत्रात पार्श्वगायक म्हणून काम करत आहेत.
यंदाच्या स्पर्धेत परीक्षक म्हणून श्रीपाद सोलापूरकर, मेधा चांदवडकर, मंजुश्री ओक, राजेश दातार, सुभाष केसकर परीक्षक म्हणून सहभागी होणार असल्याचे गायक जितेंद्र भूरुक यांनी सांगितले.
सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून वय वर्षे 15 पर्यंत लिटिल चॅम्प्स, 15 ते 30 युवा, 30 ते 50 जनरल व 50 च्या पुढील ओल्ड इज गोल्ड अशा चार वयोगटात ही स्पर्धा घेतली जाणार
आहे.
प्रत्येक विभागात विजेत्यास 15 हजार व उपविजेत्यास 10 हजार रोख रक्कम व सन्मानचिन्हे दिले जातील. सर्व गायकांना संगीत क्षेत्रातील उत्तम यश संपादित कलाकार संगीताची साथ देणार आहेत. विशेष सहभागी गायक कलाकारास उत्तेजनार्थ रोख बक्षिसे, वैद्यकीय तसेच शैक्षणिक खर्च फाउंडेशनच्या वतीने करणार असल्याचे संयोजक सनी निम्हण यांनी सांगितले.

यंदाच्या या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे व गायिका सुवर्णा माटेगावकर यांच्या शुभहस्ते दिनांक 9 मे रोजी सकाळी 10 वाजता पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक हॉल, घोले रोड येथे होणार असून अंतिम फेरी 14 मे रोजी बालगंधर्व येथे
होणार आहे. स्पर्धेचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने www.sunnynimhan.com वेबसाईट वरती तसेच शिवाजीनगर गावठाण,जंगली महाराज रोड येथे आजपासून नोंदणी सुरू झाली आहे. प्रवेश दिनांक 6 मे पर्यंत घेणे अनिवार्य राहील असे संयोजकांनी सांगितले. सोमेश्वर फाऊंडेशन बिपिन मोदी, उमेश वाघ, अमित मुरकुटे, अनिकेत कपोते कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.

See also  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० बाबत शेतकरी खातेदारांना आवाहन