बाणेर पोलीस स्टेशनसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शहर सरचिटणीस राजेश दिनकर बालवडकर यांच्या वतीने एअर कुलर भेट

बालेवाडी : बाणेर पोलीस स्टेशन, बालेवाडी हायस्ट्रीट येथील नूतन कार्यालयास राजेश दिनकर बालवडकर (सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)यांच्यावतीने विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांच्या सुविधेसाठी दोन एअर कूलर भेट म्हणून देण्यात आले.

यावेळी बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नवनाथ जगताप यांचा राजेश दिनकर बालवडकर व बालेवाडी ग्रामस्थ यांजकडून सन्मान करण्यात आला. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांचा देखील सन्मान करण्यात आला.


याप्रसंगी श्री.संदीप धारुजी बालवडकर(उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पुणे शहर), पोलीस पाटील श्री.आनंदा कांबळे , श्री.संदीप नामदेव बालवडकर, (शहर अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना)श्री.हनुमंत तात्या बालवडकर, श्री. चंद्रशेखर बालवडकर, श्री.नरेंन्द्र बालवडकर, कु.रोहित धेंडे(ऊपाध्यक्ष महाराष्ट्र प्र. कॉ), श्री.सागर बालवडकर, समीर बालवडकर उपस्थित होते. बाणेर बालेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्याकडे दोन एअर कुलर सुपूर्द करण्यात आले.

See also  विद्यांचल हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम