ॲड. पांडुरंग थोरवे उत्कृष्ट विधी सेवा पुरस्कार

पुणे :  ॲड. पांडुरंग ज्योतिबा थोरवे माजी अध्यक्ष पुणे बार असोसिएशन यांना उत्कृष्ट विधी सेवा पुरस्काराने न्यायमूर्ती प्रसन्न वराळे ( सर्वोच्च न्यायालय दिल्ली) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

थोरवे यांच्या दीर्घ, यशस्वी आणि प्रेरणादायी विधी सेवांचा गौरव करत, महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन तर्फे,पाचव्या अधिवेशनात, सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे सन्माननिय न्यायाधिश, यांचे उपस्थितीत  आपल्याला “उत्कृष्ट विधी सेवा पुरस्कार” सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

उपसभापती विधानसभा, अण्णा बनसोडे, न्या. रेवती मोहिते डेरे(मुंबई उच्च न्यायालय), न्या. संदीप मारणे (मुंबई उच्च न्यायालय) न्या. आरिफ डॉक्टर (मुंबई उच्च न्यायालय)
महेंद्र महाजन (प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे) आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन अध्यक्ष –  अॅड. सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष –  अॅड.यशवंत खराडे , सेक्रेटरी – अॅड. प्रविण नलवडे, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र- अॅड. विवेक भरगुडे, निरीक्षक पश्चिम महाराष्ट्र- अॅड. अतिश लांडगे, पुणे जिल्हाध्यक्ष- ॲड. कल्याण शिंदे, पुणे शहर अध्यक्ष- ॲड. आशिष ताम्हाणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमास मोठ्या संख्याने वकील वर्गीची उपस्थिती होती सादर कार्यक्रम प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे संपन्न झाला.

See also  नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेटइस्रोच्या 'स्पॅडेक्स PSLV-C60' यशस्वी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक