ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरेंसोबत रक्षाबंधन

पुणे : बीजमाता राहीबाई पोपरे यांनी प्रतिवर्षी प्रमाणे आपला भाऊ म्हणजे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या साठी गावरान बियाण्यांपासून राख्या तयार केल्या असून, आज ना. पाटील यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी ना. पाटील यांचे औक्षण करुन रक्षाबंधन सोहळा साजरा केला. तसेच, ना. पाटील यांच्या हातून जनसेवेचे व्रत निरंतर घडत राहो, असे आशीर्वाद देखील दिले.

गावरान बियाणांचे जतन व संवर्धनाचे मोठे काम पद्मश्री राहीबाई पोपरे सातत्याने करत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. दरवर्षी रक्षाबंधन सणासाठी त्या गावरान बियाणांपासून राख्या तयार करुन आपला भाऊ चंद्रकांतदादा पाटील यांना पाठवत असतात. यंदाही त्यांनी गावरान बियाणांपासून राख्या बनवून स्वतः ना. पाटील यांना बांधली.

यावेळी ना. पाटील यांनीही नम्रपणे राहिबाईंचे आशीर्वाद घेतले. ईडा पीडा टळो, माझा भाऊ चंद्रकांतदादाच्या लोकांच्या सेवंचं काम कायम घडत राहो, असे आशीर्वाद दिले.

See also  गृहनिर्माण संस्थांसाठी औंध येथे मार्गदर्शन मेळावा