बाणेर : अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ, व्यापारी संघटना व साम्राज्य ग्रुप बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळकाल्या निमित्त सलग १५ व्या वर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दहीहंडीच्या निमित्ताने परिसरातील डॉक्टर, वकील तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ व पोलीस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हजारो गोपाळ भक्तांनी दहीहंडीच्या उत्सवात सहभाग घेतला. विशेष म्हणजे न्यू शिवाजीनगर मित्र मंडळ कळवा मुंबई यांनी सर्व गोपाळ भक्तांचे मन जिंकणारा व नारीशक्तीचा प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या ‘महिषासुर वध’ प्रात्यक्षित सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. तसेच चरई नागरी मित्र मंडळ नवी मुंबई यांनी सात थराची सलामी दिली, मराठा गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला मंडळाचा सत्कार बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश तापकीर, साम्राज्य ग्रुपचे मंदार पोरे, अक्षय तापकीर, कार्याध्यक्ष विनायक चिव्हे, पंकज तापकीर, वैभव तापकीर, अमोल टिळेकर, तसेच व्यापारी संघटना बाणेर व अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व साम्राज्य ग्रुप चे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.मंडळाच्या आधारस्तंभ गुलाबराव तापकीर. संतोष तापकीर उपस्थित होते