बहुजन समाजाचे नेतृत्व म्हणून मी निवडणुक लढवत असून प्रस्थापितांना समाजाच्या ताकदीवर नक्कीच धक्का देणार – विजय डाकले

कोथरूड : बहुजन समाजाचे नेतृत्व करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभा असून प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सर्व समाज माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. विकास कामांच्या नावाखाली दुसऱ्यांचे श्रेय लाटण्याची कामे मागील पाच वर्षात झाली यामुळे नागरिक सुज्ञपणे विचार करून त्यांच्यातील उमेदवार म्हणून मला निवडून देतील असे विजय बापू डाकले यांनी सांगितले.

कोथरूड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विजय बापू डाकले यांनी हनुमान नगर,  केळेवाडी भागात मतदार व नागरीकांच्या भेटी घेत प्रचार केला. यावेळी स्थानिक नागरिक, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, बुध्द विहाराचे अभिभावक, समाजमंदिरे या ठिकाणी ऊत्सफुर्तपणे  स्वागत करण्यात आले.

कोथरूड मध्ये विजय डाकले यांच्या माध्यमातून बहुजन समाजाचे नेतृत्व करण्यासाठी उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. त्यांना समाजाच्या विविध सामाजिक संघटना, वंचित घटकातील पदाधिकारी आदी स्तरातून पाठिंबा मिळत असून कोथरूड मधील प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात त्यांनी आवाहन उभे केले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

See also  पुणे येथे १४ ते १६ एप्रिल दरम्यान वसुंधरा धान्य महोत्सव