महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात,  काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे मत

पुणे : भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगार पुरक शिक्षण व्यवस्था व  संगणक व इंटरनेट क्रांती झाली. अन् डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली. यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात, असे मत कॉँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एन. एम. डी . प्रा. लि. आणि एन. एम. डी. इन्फॉटेकच्या आठव्या वर्धापन दिनी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, श्रॉफ ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन जे. पी. श्रॉफ, वरिष्ठ पोलिस अधिकारी पी. आय वाघमारे, एनएमडी ग्रुपचे संस्थापक नवनाथ मोहन दरेकर, प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले,  नुकतेच झालेल्या सिंदूर ऑपरेशन मधील कर्नल सोफिया असेल किंवा  येथे शेतकऱ्यांच्या मुलांना पाठबळ देणारा नवनाथ दरेकर सारखा तरुण असेल त्यांनी हे दाखवून दिले आहे. त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांना आपल्या स्वप्नांना आकार देण्याचे बळ लाभले. 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, मी जेव्हा जेव्हा परराज्यात किंवा परदेशात जाते तेव्हा मराठी उद्योजक दिसत नाही. मराठी माणूस उद्योक, व्यावसाव करू शकत नाही, असं बोललं जात पण आज मला मराठी असल्याचा अभिमान वाटतोय. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आज येथे मिळाली आहे.

नवनाथ दरेकर म्हणाले, डिजीटल युगात काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण देण्यास सुरूवात झाली. या दरम्यान अनेक शेतकरी पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे आपण योग्य काम करतोय याची खात्री झाली. पुढील काळात आणखी शेतकऱ्यांच्या मुलांना मदतीचा हात कसा देता येईल याचा प्रयत्न असेल.

See also  सुस म्हाळुंगे ग्रामस्थांचा NH7 विकेंडर कार्यक्रमास विरोध

प्रशांत दरेकर म्हणाले, नवनाथ यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका खेड्यांत शालेय शिक्षण घेतले. पुढे पुण्यात येऊन कष्टाने स्वतचे वेगळे स्थान निर्माण केले, नाव कमावले.  आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून ट्याने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपरं राबविला, यातून हजारो कुटुंबाचा टॉ आधार बनला आहे, त्यांची वाटचाल पुढेही अशीच सुरू राहो अशा सदिच्छा त्यांनी दिल्या. 

या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्याना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले.