महाविद्यालयाची व्हर्टिकल वाढ करण्याचा मानस आहे : संस्थेचे कार्यवाह मा डाॅ गजानन र. एकबोटे

पुणे : गणेशखिंड येथिल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामधे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळावर सलग सहव्यावेळी बिनविरोध निवडुन आल्याबद्दल सर्व पदाधिकार्यांचा सत्कार समारंभ महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आला.
संस्था आता ९० वर्षाची झाली आहे. बिनविरोध सदस्य निवडून येणे हे एक संस्थेचे वैशिष्ट्ये आहे.शैक्षणिक गुणवत्तेत संस्था कुठेच तडजोड करत नाही.सर्व स्तरातील विद्यार्थाना परवडणार्या फी मधे शिक्षण देण्याचा संस्थेचा अट्टहास आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र सतत वाढत असुन संस्था सामुहिक(क्लस्टर) विद्यापीठाकडे वाटचाल करत आहे.


या प्रसंगी बोलताना प्रा सौ जोत्स्ना एकबोटे यांनी सर्वांचे अभिनंदन करुन संस्था कर्जातुन बाहेर काढून एवढा मोठा वटवृक्ष उभा झाल्याबद्दल कौतुक केले.कनिष्ठ व मध्यम वर्गीयांचा विचार करुन संस्था कार्य करत राहिल असे त्यांनी सांगितले.
सचिव प्रा. शामकांत देशमुख म्हणाले संस्थेची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झाली आहे. या महाविद्यालयात १९९२ पासून लक्षणिय वाढ झाली आहे.डाॅक्टर साहेबांनी घेतलेल्या परिश्रमाचे चांगले चिज झाले आहे. अनेक अडचणीला सामोरे जात हे विद्यालय पुढे गेले व अत्यंत कमी काळात या महाविद्यालयाने कौतुकस्पद भरारी घेतली आहे. चांगले सहकारी, चांगले शिक्षक, चांगले प्राचार्यामुळे महाविद्यालय अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. महाविद्यालयाची व्हर्टिकल वाढ करण्याचा मानस आहे असे मनोगत संस्थेचे कार्यवाह मा डाॅ गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले.व सहकार्यांच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.


या कार्यक्रमामधे प्रा. डाॅ. गजानन र.एकबोटे यांची सलग ६व्या वेळी बिनविरोध निवड झाली, प्रा शामकांत देशमुख, सचिवपदी, डाॅ सौ जोत्स्ना एकबोटे, सहकार्यवाहपदी बिनविरोध निवड, मा प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह, मा डाॅ प्रकाश दिक्षित, उपकार्यवाह, मा प्रा डाॅ निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह, मा श्री मच्छिंद्र कांबळी, उपकार्यवाह, मा श्री दिपक मराठे, उपकार्यवाह या सर्वांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी केले.
कार्यक्रमाची सुरवात ऋतुज चांदेकर व शिवम बाकरे यांच्या नांदी गायनाने झाली. पसायदान वरदा पुरोहित यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ ज्योती गगनग्रास यांनी केले. प्रा डाॅ मनीषा बेले यांनी कार्यवाह डाॅ एकबोटे यांच्या वरील सुंदर कविता सादर केली. संदीप इरेवाड व सुतार यांची सुंदर रांगॊळीसाठी विशेष सत्कार करण्यात आला. आभार उपप्राचार्य डाॅ शुभांगी जोशी यांनी व्यक्त केले.

See also  हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे